Tuesday 3 May 2016

जबरदस्त मार्मिक कविता

🙏जय भिम🙏

👊जबरदस्त मार्मिक कविता👊

बाप नाचतो देवा पुढे
आई करते आरती...
काय संस्कार होतील
मुला बाळांवरती...

गणपतीची आरती तोडपाठ झाली...
बुध्द वंदना अजुन घरी सुरुच नाही केली...

हातात आहे मोबाईल
विचार मांडले शुध्द...
विचारा कधी मनाला की
खरचं समजला आहे का बुध्द?

करत आहेत भंडारा
चालतो देवाला पायी...
विहारात अजुन येत जात नाही...

कपडे घालुन शुभ्र
' जय भिम' करतो जोरात...
33कोटी देवाच
ठान त्याच्या घरात...

नारळ फोडुन देवाला
हार फुलं वाहे...
गाव देवी म्हणे माझे
कुळ दैवत आहे...

फेकुन द्या रे आता तरी
हिंदु चाली रुढी...
तरच धम्ममय होईल
आपली भावी पिढी...


साधी आहे गोष्ट ही
फक्त तुम्हाला कळु द्या...
आता आपली पावले
बुध्दविहारी वळु द्या...

🙏जय भिम🙏

No comments:

Post a Comment