Tuesday 3 May 2016

पिंपळ झाड!!!

सगळी भुते पिंपळाच्या झाडाखाली का आढळत
असावेत ?
भारतात काश्मिर ते कन्याकुमारी व गुजरात ते
गोहाटी कोठेही जा तुम्हाला पिंपळाच्या झाडाखालीच
भुते असतात असे लोकं म्हणतात. भारतात
वनस्पतींच्या लाखो प्रजाती आहेत मग
सगळी भुते , हडळी, प्रेतात्मे, पिशाच्चे
पिंपळाच्याच झाडाखाली/वर का आढळत
असावेत?
कारण प्राचीन काळी गौतम
बुद्धांना पिंपळाच्या झाडाखाली ज्ञानप्राप्ती झाली म्हणुन !
भारतात पिंपळाच्या झाडाचे महत्व प्रचंड
वाढले.याला शास्त्रीय कारण असे की पिंपळ
वातावरणात आँक्सिजन जास्त
सोडतो.जुन्या काळी लोक योगविद्या,
ध्यानधरनेसाठी पिंपळाखाली
बसून अध्यात्मिक चर्चा करीत असत .
आजही लोक गावात पारावर जमतात तेथे
पिंपळाचेच झाड असते. एवढेच नव्हे तर
बोधगया येथील २५०० वर्षापुर्वीचे झाड
अजुनही लोकांनी जपुन ठेवलेआहे. अशा रीतीने
पिंपळाचे झाड
बुद्धाच्या तत्वज्ञानाच्या प्रसाराचे ठिकाण
बनले.याचा काही कर्मठ
मनुवाद्यांनी याचा खुपच
धसका घेतला आणि बौद्ध धम्माचा प्रसार
रोखण्यासाठी,त्य
ांनी पिंपळाच्या झाडाखाली भुत असते
अशा अफवा पसरवण्यास सुरुवात केली. म्हणुन
आजही सामान्य माणसाचा असा समज
असतो की पिंपळाच्या झाडाखाली भुते
असतात.
लक्षात ठेवा...
* भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार
"भारतरत्न'
हा पिंपळाच्या पानावरच दिला जातो.*
भारताचा राष्ट्रीय वृक्ष सुद्धा पिंपळ आहे !
अमेरिकेच्या राष्ट्रपतींनी राजघाटावर
"पिंपळ'वृक्षाचे रोपण केले.हे कशाचे द्योतक आहे !

No comments:

Post a Comment