Thursday 5 May 2016

धर्म की धम्म ?

धर्म की धम्म ?
धर्म की धम्म ? ---------------------------------🔹
मराठीत "धर्म" शब्दाचा अर्थ कर्तव्य असा आहे.हिंदु धर्म म्हटल्यावर त्यातील धर्म शब्दाची संकल्पना अशी आहे की,ईश्वर,देवदेवता,
उपासतपास,पूजा-अर्चा,कर्मकांड, व त्या संबंधीचे विधि उत्सव ईत्यादी,भट-भिक्षूक,ब्राम्हण पूजारी यांच्या अधिपत्याखाली किंवा वर्चस्वाखाली रुढ करण्यात आलेली पारंपारिक धार्मिक कर्तव्य-कर्मे यथासंग पार पाडण्याचे नियम पाळणे.इतकेच न्हवे तर त्यामध्ये चांगले-वाईट,
योग्य-अयोग्य,खरे-खोटे,हितकर-अहितकर,पटणारे न पटणारे,अनुकूल-प्रतिकूल,मान्य-अमान्य व नैतीक अनैतिक ईत्यादिचा विचार करणे निषिध्द किंवा धर्म-ब्राह्य व नास्तिकपणाचे मानले जाते.त्या धर्मातील अनुयायायांना विचार स्वातंत्र्य वा अन्य पर्यायी मार्ग ठेवलेला नाही.कर्तव्ये निमूटपणे-बिनतक्रार पाळण्याखेरीज खरी धर्मनिष्ठा मानली जात नाही व पुण्य लाभ होत नाही,मिळत नाही.अशारितीने धर्म या शब्दाशी अंध:श्रध्देचा घनिष्ट सबंध आहे.
उलट तथागत बुध्दांने धर्म या शब्दाऐवजी "धम्म" हा पाली शब्द विशिष्ट अर्थाने वापरलेला आहे.धम्म म्हणजे सदाचार,सद् विचार व सन्मार्ग होय म्हणजेच विशुध्द मानवी जीवनमार्ग होय.आपल्या मुक्तिसाठी कोणतेही दैवी किंवा दिव्य शक्ति मानून तिला शरण जाण्याऐवजी मानवाने आपल्या स्वत:ला शरण जाउन "अत्तादिप अत्तसारण भव" सन्मार्गी बनले पाहीजे.ज्ञान,सत्य व व्यवहार यावर आधारित व माणवी जीवनाच्या परिपूर्ण विकासाला उपायकारक असे जे आचार विचार वा संस्कार या सबंधीची शिकवणूक म्हणजे धम्म.हा एक बुध्दीनिष्ठ मार्ग आहे.
बुध्द धम्मात ईश्वर,देव-देवता,आत्मा,अवतार,मरणोत्तर अस्तित्व,कर्मकांड व्रत वैकल्य,उपास-तापास,नवस,तीर्थप्रसाद-नैव्यद्य,देवपावतो-देवकोपतो व धर्म-ग्रंथ-प्रामाण्य,वर्णभेद या सर्व गोष्टी मानवाने रचलेल्या अनावश्यक व अर्थहीन कल्पना आहेत व या सर्व कल्पना लोकांच्या मनावर राबविण्यासाठी भट-भिक्षुक-ब्राम्हणाच्या पावित्र्यांचे,उच्चतेचे व त्यांच्या वर्चस्वाचे स्तोम-कारस्थान स्पष्ट व सम्यक संकल्पना व शिकवणूक आहे.म्हणून बौध्दधम्म एक महाण बंड आहे.तशीच क्रांतीकारी चळवळ आहे.बौध्दधम्मात मूर्तीपूजेचे स्तोम नाही.आदर्श वंदनाची अभिव्यक्ति आहे.
 बौध्द धम्म संस्थापक तथागत बुध्द हे देव नाहीत.देवाचे पुत्र किंवा देवदुतही नाहीत.मोक्षदाता ही नाहीत तर ते एक अव्दितीय महामानव व जगमान्य जगद् गुरु मार्गदाता आहेत.म्हणून बुध्द प्रतिमेची सगुण पुजा करणे.म्हणजे मूर्तिपुजा अमान्य आहे.ती गुणांची-सत्वांची प्रतिकात्मक पुजा आहे.बौध्द धम्मातील धम्मसाधनेत-उपासनेत किवा पुजेत प्रार्थना शब्द नाही.शरण पुजा व वन्दना हे शब्द आहेत.कारण प्रार्थना या शब्दाचा अर्थ विनंती आहे.बुध्द उपासनेत कोणीही देवादिकांना विनंती नसुन आत्मनिरीक्षण व आत्मपरीक्षण म्हणजेच आत्मपुजन आहे.ती एक मानसपूजा आहे.
सचित परीयोदपंन एतं बुध्दानु सासनं !!
चांगल्या "कुशल" गोष्टीवर निष्ठा ठेऊन ते शरण्य मानून चांगले वागणे व त्याव्दारे आपले जीवन उन्नत,प्रसन्न,शांत व धन्य करणे.हे धम्म उपासनेतील अंतीम साध्य आहे.त्यालाच निर्वाण पदप्राप्ति म्हणतात.
  बौध्द धम्मात तीन पूज्य व मौलिक शरण्य मानलेली आहेत ते तीन आदर्श आहेत ते आदर्श म्हणजेच बुध्द धम्म व संघ त्यांचे स्पष्ट अर्थ समजणे अगत्याचे आहे.
मनुष्यत्वाच्या परीपुर्ण विशुध्द विकासाचा दैदिप्यमान व स्वयंसिध्द आदर्श म्हणजे बुध्द व त्यांचे बुधत्व.प्रज्ञा,शिल,करुणा व समाधि ही त्या आदर्शाची मूळ तत्वे.
बुध्दत्वाची म्हणजे परीपुर्ण विकासाची प्राप्ती करुण घेण्याचा बुध्दाने दाखवून दिलेला व उपदेशिलेला आचरण जीवन म्हणजे धम्म यात उत्तमोत्तम आठ प्रकारचे मार्ग आहेत.त्यांना आर्य अष्टांगीक मार्ग म्हणतात.त्या धम्म मार्गाचे आपल्या स्वत:च्या उदाहरणाने आदर्शवत् आचरण करण्यास प्रतिज्ञाबध्द झालेल्या सदाचारी सेवाभावी,सत्यवादी अशा सज्जनाचा समुदाय म्हणजेच संघ होय त्यात श्रमण "भिक्खु" व उपासक गृहस्थ असे दोन प्रकार आहेत.
या तीन शरण्यांना म्हणजे जीवन मूल्यांना आपली निष्ठा व सर्वस्व मानणाऱ्या व्यक्तिंना बौध्द उपासक म्हणजेच बुध्दानुयायी म्हणतात.
 म्हणून बौध्द धम्म हा धर्म नसून विशुध्द व तर्कशुध्द असा मानवी जीवनमार्ग आहे.त्याला सन्मार्ग,मानवधर्म व आचरणधर्म म्हणतात.
नमोबुध्दाय.🌹👬
जयभीम.🌹👬
बुध्द धम्म अनुसरण संघ

1 comment: